घातपाताचा डाव उधळला : जमात-उल-मुजाहिद्दिनचे तीन संशयीत दहशतवादी जाळ्यात


कोलकाता : कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलानं (एसटीएफ) जमात-उल-मुजाहिद्दिनच्या तीन संशयीत दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटकेतील दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून घातपाताचा मोठा डाव उधळण्यास यश आले आहे. कोलकाता पोलिसांच्या एसटीएफनं शनिवारी रात्री संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.

संशयीत बांग्लातील रहिवासी
शनिवारी रात्री हरीदेवपूर परिसरातून एसटीएफनं तिन्ही संशयितांना अटक केली. तिघेही बांग्लादेशचे नागरिक आहेत. त्यांचं कनेक्शन पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. नाजी-उर-रहेमान, शेख शब्बीर आणि रिजाऊल अशी संशयितांची नावं आहेत. अटकेतील तिघे जमात-उल-मुजाहिद्दिनचे सक्रीय सदस्य असल्याची माहिती एसटीएफचे सहआयुक्त व्ही. सोलोमन नेसा कुमार यांनी दिली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !