माजी मंत्री खडसेंच्या जावयाला 15 पर्यंत ईडीची कोठडी
मुंबई : भोसरी जमीन प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अटक केली होती. याआधी त्यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर 12 जुलै रोजी कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली. अर्थात चौधरी यांना आता 15 जुलैपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे. या तीन दिवसांमध्ये गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात येणार आहे. याच प्रकरणात याआधी एकनाथराव खडसे यांची देखील तब्बल नऊ तासांची चौकशी ईडीतर्फे करण्यात आली आहे तर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. त्यांनी ईडीकडे हजर होण्यासाठी मुदत मागून घेतली आहे.




