चाळीसगाव तालुक्यात 84 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
चाळीसगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यावरील बोढरे फाट्याजवळ एका ट्रकमधील 84 लाख रुपये किंमतीचीा अवैध मद्यसाठा जप्त केला. ट्रक चालक अजय कन्हैय्यालाल यादव (41, इंदौर मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सांगवी शिवारात बोढरे फाट्याजवळ ट्रक (एम.पी.09 एच.जी. 9354) आला असता त्यात गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याचा साठा आढळला. टाटा कंपनीचा (एम.पी.09 एच.जी. 9354) क्रमांकाचा ट्रकसह एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे सी.एच. पाटील, दुय्यम निरिक्षक एस.एस. रावते, ए.डी. पाटील आणि जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर यांच्या पथकाने केली. त्यांना के.डी. पाटील, सी.आर. दांगट, आर.टी. खैरे, सी.आर. शिंदे, महेंद्र बोरसे, अण्णा बहिरम, संजय सोनवणे आणि शशिकांत पाटील आदींनी केली.