संतापजनक : डॉक्टर महिलेच्या बाथरूममध्ये लावले छुपे कॅमेरे
पुणे : महिला डॉक्टरच्या रुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याप्रकरणी एम.डी.डॉक्टर असलेल्या सुजीत जगताप (42) यास पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी केलेल्या सीसीटीव्हीत डॉ.सुजीत जगतापचं नाव समोर आल्यानंतर त्याची चौकशी केली असता हा प्रकार उघड झाला. भारती विद्यापीठ कॅम्पस परीसरात असणार्या कॉर्टरमध्ये तक्रारदार डॉक्टर राहते. 6 जुलै रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्यानंतर घरी परतल्या असता त्यांना घरातील वातावरण संशयास्पद वाटले. बाथरूम आणि बेडरूममध्ये काही छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.