दहावी परीक्षेचा निकाल जाहीर : राज्याचा निकाल 99.95 टक्के


पुणे : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला असून राज्याचा एकूण निकाल 99 .95 टक्के तर कोकण विभागाचा 100 टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा 99.84 टक्के निकाल लागला आहे. कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला.

अंतर्गत मूल्यमापानाच्या आधारे जाहीर झाला निकाल
नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर 15 जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे : 99.65
नागपूर : 99.84
औरंगाबाद : 99.96
मुंबई : 99.96
कोल्हापूर : 99.92
अमरावती : 99.98
नाशिक : 99.96
लातूर : 99.96
कोकण : 100


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !