मिनी प्लेन कोसळल्याने पायलटचा मृत्यू : सहपायलट जखमी


चोपडा : तालुक्यातील वर्डीजवळील रानतलाव परीसरात शुक्रवारी विमानाला अपघात होवून ते कोसळल्याने पायलटचा मृत्यू झाला तर सहकारी महिला पायलट जखमी झाली. वर्डी गावापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असणार्‍या रानतलाव या परीसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिरपूर एव्हीएशनचे मिनी प्लेन कोसळले. शेतात काम करणार्‍यांना मोठा आवाज ऐकल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता वैमानिक पुरूष वैमानिक नरूल अमीन यांचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला सहकारी पायलट अंकिता गुजर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी शिरपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती चोपड्याचे तहसीलदार अनिल गावीत यांनी दूरध्वनीवरून दिली. चोपडा तहसीलदारांसह पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !