भरधाव आयशरची दुचाकीला धडक : मध्यप्रदेशातील तीन मजूर ठार


औरंगाबाद : भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मध्यप्रदेशातील तिघे मजूर ठार झाल्याची घटना कन्नड बायपासवर घडली. मूळ मध्यप्रदेश येथील मुकेश केकडिया निगवाल (२७), भुवानसिंग छमकार निगवाल (२७), सुनील पुण्या असकल्य (२८) हे मजुरीचे काम करतात. शनिवारी दुपारी कन्नडकडून -चाळीसगावकडे तिघेही एकाच दुचाकीवरून (क्र. एम.एच २० बी.एस.३९९३) सोलापुर-धुळे महामार्ग ओलांडीत असतांना चाळीसगावकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने (क्र एमएच २० इएल ३६४४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !