आतेबहिणीची मामेभावाने केली हत्या


अकोला : हेडफोन न दिल्याच्या कारणावरून आतेबहिणीची तिच्याच मामेभावाने हत्या केली. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोडवर ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या हत्याकांडातील आरोपीस खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माधवनगर येथील रहिवासी नेहा नंदलाल यादव (२०) व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी-शेजारी राहतात. शनिवारी सायंकाळी हे दोघेही घरी असताना त्यांच्यात मोबाइलच्या हेडफोनवरून वाद सुरू झाला. या वादात ऋषिकेश उर्फ बॉबीने संतापात येत आतेबहीण नेहाच्या पोटात धारदार चाकूने वार केले. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या नेहाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !