कर्जाच्या विवंचनेत शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या


अकोट : कर्जाच्या विवंचनेत दाम्पत्यानी आत्महत्या केली. शनिवार, 18 जुलै रोजी दुपारी ही घटना घडली. अकोट तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या शहापूर रुपागड या गावातील सुरज तुकाराम भारसाकळे (35) व पत्नी कविता सुरज भारसाकळे (30) अशी मयतांची नावे आहेत. दाम्पत्याकडे अडीच एकर शेती असून शेतात दुबारपेरणी केल्यानंतर कर्जाचे आर्थिक संकट उभे ठाकल्याने आदिवासी समाजातील पती-पत्नीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !