भुसावळात उद्या उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा होणार
भुसावळ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सायंकाळी सात वाजता स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांतर्फे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे.

