सेवा ज्योती यात्रेतून भुसावळात सेवाभावाचा जागर
भाजपाच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्हास्तरीय बाईक रॅली ; मातृभूमी चौकात ‘विकसीत भारत संकल्प सभा’
भुसावळ (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्हास्तरीय ‘सेवा ज्योती यात्रा’ शहरातील विविध मार्गावरून बुधवार, 7 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली. भव्य बाईक रॅलीचा समारोप मातृभूमी चौकात आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभे’त करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि देशभक्त नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यांचा होता सहभाग
या जिल्हास्तरीय ‘सेवा ज्योती यात्रेस’ केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, विधान परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, भाजपा जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांतअण्णा बाविस्कर, जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन, भुसावळ प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, प्रफुल जवरे, आतीश झाल्टे, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, गटनेते युवराज लोणारी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध मार्गावरून निघाली रॅली
नाहाटा कॉलेजपासून सुरू झालेली बाईक रॅली शहीद राकेश शिंदे स्मारक, जामनेर रोड, महाराणा प्रताप विद्यालय, प्रोफेसर कॉलनी मार्गे मातृभूमी चौकात पोहोचली. घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मातृभूमी चौकात रॅलीचा समारोप ‘विकसीत भारत संकल्प सभे’त करण्यात आला. सभेची सुरुवात ‘वंदे मातरम’ आणि महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर भारतमातेच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘सेवा ज्योती’चे प्रज्वलन करण्यात आले.
पंतप्रधानांनी केले राष्ट्राला संबोधीत
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सेवा, विकास आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे राष्ट्राला संबोधित करणारे ऑनलाईन भाषण उपस्थितांनी ऐकले.
यांची होती उपस्थिती
यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, गोलू पाटील, संदीप सुरवाडे, सरचिटणीस आनंदा ठाकरे, सागर चौधरी, तुषार पाटील, विजय तायडे, अनिल वारके, अतुल झांबरे, श्यामल झांबरे, महेश सोनवणे, राजेंद्र आवटे, अॅड.बोधराज चौधरी, देवा वाणी, सुजित भोळे, गिरीश महाजन, बापू महाजन, रुपेश देशमुख, सतीश सपकाळे, अल्बर्ट तायडे, अजय नागराणी, विलास सातदिवे, विशाल नाटकर, श्रेयस इंगळे, राजेंद्र नाटकर, सीमा नरवाडे, मेधा वाणी, डॉ.छाया देशमुख, आशा कैलास पाटील, महिला शहराध्यक्षा अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, ममता वारके, प्रीती कोलते, माधुरी चौधरी, राहुल तायडे, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव आवटे, संकल्प वाणी, रुषभ राजपूत, सचिन बर्हाटे, नंदकिशोर बडगुजर, मनिष पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा ज्योती यात्रा च्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, भाजपा भुसावळ शहराध्यक्ष किरण कोलते, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, जयंत माहूरकर, कार्यालय मंत्री चंदन पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


