चारचाकीवर झाड आदळल्याने तिघा शिक्षकांचा मृत्यू
नाशिक : चारचाकीवर अचानक वाळलेले झाड कोसळल्याने तिघा शिक्षकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत नाशिक-कळवण रोडवरील वरखेडा फाट्याजवळ ही घटना घडली. या घटनेत दत्तात्रय गोकुळ बच्छाव (51, रा.नाशिक), रामजी देवराम भोये (49), नितीन सोमा तायडे (32, रा.तारवला नगर,पंचवटी) यांचा मृत्यू झाला. मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मयत सुरगाणा येथे शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगुन येथे शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.