पती-पत्नीचा मृतदेह आढळला
मुंबई : मूळचे केरळ येथील रहिवासी व फोर्ट परीसरातील एका बँकेत काम करणार्या दाम्पत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वरळी नाक्यानजीक असलेल्या भारत मिल संकुलात ही घटना उघडकीस आली. मृत पतीचे नाव अजय कुमार (30) तर पत्नीचे नाव सुज्जा एस (34) असं आहे. नियंत्रण कक्षास पती पत्नीचे मृतदेह आढळल्याची माहिती दाम्पत्याच्या मैत्रिणीनं दिली. त्यानंतर वरळी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन नायर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. या दाम्पत्याला एप्रिल – मे 2021 दरम्यान कोरोना झाला व त्यानंतर त्यांनी कोरोनाचा धसका घेतला होता. त्यातूनच या पती पत्नीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.