भरधाव टेम्पोने उडवल्याने चार भाविकांचा मृत्यू


बीड : भरधाव टेम्पोने उडवल्याने चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी मालेगाव येथून 17 भाविक निघाले असता बीड – उस्मानाबाद दरम्यान तेरखेडा गावाजवळ या गाडीचे मागील चाक पंक्चर झाल्याने चाक बदलत असताना मागून भरधाव येणार्‍या आयशर टेम्पोने उभ्या असलेल्या युवकांना उडवले. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. हे सर्व प्रवासी दरेगाव, वडगाव व सायने (मालेगाव) येथील आहेत. जखमींना उस्मानाबाद येथील खासगी व सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

या भाविकांचा मृत्यू
या अपघातात टेम्पोतील शरद विठ्ठल देवरे (44), विलास महादू बच्छाव (46), जगदीश चंद्रकांत दरेकर (45) सतीश दादाजी सूर्यवंशी (50) हे चौघे जागीच ठार झाले तर संजय बाजीराव सावंत (38), भरत ग्यानदेव पगार (47) व गोकुळ हिरामण शेवाळे (38) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर उस्मानाबादच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. चालकाविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !