युपीत भीषण अपघात : नवदाम्पत्यासह सह जण ठार


नवी दिल्ली : भरधाव टेम्पोने इको कारला जोरदार धडक दिल्यानंतर नवदाम्पत्यासह सहा जणांचा मृत्यू ओढवला. उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये सिव्हिल लाईन्स पोलीस ठाणे हद्दीत हायवे बायपासवर हा अपघात झाला आहे. या अपघातात नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर नववधू गंभीर जखमी झाल्याने अ‍ॅम्बुलन्समधून जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरती केले असता उपचारावेळी नववधूनेही प्राण सोडला. घटनास्थळावरून टेम्पो चालक पसार झाला.

नवविवाहित जोडप्याचा मृत्यू
आंब्यांची वाहतूक करणार्‍या टेम्पोने नवदाम्पत्याच्या चारचाकीला धडक दिल्याने जागीच पाच जणांचा मृत्यू झाला तर उपचारादरम्यान नववधूची प्राणज्योत मालवली. मृतांमधील सर्व ग्रेटर नोएडाचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. वरीष्ठ पोलिस अधिकारी संसार सिंह यांनी सांगितले की, इको कारमधील लोक बिहारमध्ये लग्न करून परतत असताना हा भीषण अपघात झाला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !