भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने पटकावले सुवर्णपदक


नवी दिल्ली : हंगेरीमध्ये सुरु असलेल्या जागतिक कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक पटकावले आहे. 75 किलो वजनाच्या महिला गटात हरियाणाच्या प्रिया मलिकने हे यश मिळविले आहे. प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला 5-0 ने पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. प्रिया मलिकने याआधी 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, 2019 मध्ये दिल्लीतील 17 व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2020 मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
एक दिवस आधीच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने (चळीरलरळ उहरर्पी) ने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावले होते. प्रिया मलिकने पटकावलेले पदक हे ऑलिम्पिकमधील नसले तरी रेसलिंगच्या जगतातील एका मोठा स्पर्धेतील आहे. यामुळे या तिच्या कामगिरीचे देखील सर्वा स्तरातून कौतुक होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !