विद्युत तारांचा शॉक लागल्याने पिता-पूत्राचा मृत्यू


वडगाव कांदळी : शेतामध्ये ऊसाला औषध फवारणी करत असताना रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉक लागून पिता-पूत्राचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द येथे कमलजा मातानगरात ही घटना घडली. या घटनेत यादव भिमाजी पटाडे (70) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे (37) यांचा मृत्यू झाला. शेतकर्‍याच्या शेतामध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून बंद पडलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा होत्या. वादळामुळे खांब पडल्यामुळे या तारा शेतामध्ये तशाच पडून होत्या. तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू नव्हता परंतु अचानकपणे विद्युत प्रवाह सुरू झाल्याने फवारणी करणार्‍या दोघांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला.

मृत्यूस महावितरण जबाबदार
शेतामध्ये काम करत असताना विजेचा शॉक लागून पिता – पुत्राच्या मृत्यूस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप बोरी खुर्द ग्रामस्थांनी केला आहे. गेली तीन ते चार वर्षापासून बंद असणारी विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी बंद होती. तिच्या तारा तशाच खाली पडून होत्या अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रारी करूनही या तारा महावितरणने हटवल्या नाहीत. वेळीच या तारा महावितरणने काढल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !