अल्पवयीन तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार


जालना : अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री संशयित आरोपी सोनू सय्यद जहीर (रा.सिंधी काळेगाव, ता.जालना, ह.मु.ठाणे) याच्याविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जालना शहरातील 17 वर्षीय मुलीचे लग्न जानेवारी महिन्यात सिंधी काळेगाव येथील सोनू सय्यद जहीर याच्यासोबत जमले होते मात्र सोनू सय्यद जहीर हा कुठेही नोकरीला नसून, मजुरीचे काम करत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर
लग्न मोडण्यात आले. परंतु, सोनू सय्यद जहीर व मुलीचे प्रेम संबंध असल्याने ते दोघेही ठाणे येथे निघून गेले. तेथे सोनूने तिला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. लग्नाचे नाव काढल्यास तो टाळाटाळ करत असल्याने अल्पवयीन मुलगी पुन्हा जालना येथील आई-वडिलांकडे परतली. तिने आई-वडिलांना घडला प्रकार सांगितल्यानंतर आरोपी सोनू सय्यद जहीरविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !