80 हजारांच्या लाचेचा मोह नडला : फौजदार अडकला एसीबीच्या जाळ्यात


आष्टी : दाखल गुन्ह्यात मंजूर असलेला अटकपूर्व जामीन हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी तडजोडीअंती 80 हजारांची लाच मागणार्‍या अंभोरा पोलीस ठाण्यातील फौजदाराला औरंगाबाद एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राहुल पांडूरंग लोखंडे (रा.तिरूपती पार्क, पिसादेवी पार्क, प्लॉट नंबर 02, औरंगाबाद) असे अटकेतील फौजदाराचे नाव आहे.

लाच स्वीकारताच केली अटक
20 जुलै रोजी तक्रारदारविरूध्द अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्यात मंजूर असलेला अटकपूर्व जामीन हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी फौजदार राहुल लोखंडे यांनी एक लाखांची लाच मागितली व त्या तडजोड होवून 80 हजारांची रक्कम देण्याचे ठरले. तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार करताच सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी औरंगाबाद एसीबीने फौलदार लोखंडे यांना लाच स्वीकारताच अटक केली. याबाबत अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !