भूम उपविभागीय अधिकार्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
एक लाख 10 हजारांची लाच प्रकरणी कारवाई : महसूल वर्तुळात मोठी खळबळ
उस्मानाबाद : वाळू वाहतूकदाराकडे एक लाख 10 हजारांची मागणी केल्याने भूम उपविभागीय अधिकार्यांसह कोतवालास एसीबीच्या पथकाने मंगहवारी अटक केल्याने महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर व कोतवाल विलास नरसिंग जानकर अशी अटकेतील संशयीत आरोपींची नाव आहे.
वाळू वाहतूक प्रकरणी लाच भोवली
वाळू वाहतूकदारावर कारवाई न करण्यासाठी व वाळू वाहतूक सुरळीत चालू देण्यासाठी भूम उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांनी संशयीत आरोपी तथा कोतवाल विलास जानकर यांच्यामार्फत एक लाख 10 हजारांची लाच मागितली व यावर तडजोड होवून 90 हजार रुपये ठरवण्यात आले व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारदाराने पहिल्या हप्त्यापोटी 20 हजारांची लाच कोतवाल विलास जानकर यास दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यास अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या पथकोन केली.