सात महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा : दारूडा प्रियकर जाळ्यात


नवी दिल्ली : नको त्या अवस्थेत मेहुणीला पाहिल्यानंतर आपल्याच मेहुण्याची मेहुणीने दारूड्या प्रियकराच्या मदतीने हत्या केली होती. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमधील तेंदूखेडा पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना सात महिन्यांपूर्वी घडली होती. पोलिसांना त्यावेळी या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले नाही मात्र दारूड्या प्रियकराने मद्याच्या नशेत ही घटना बरळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत गुन्ह्याची उकल केली.

मेहुणीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् गमावला जीव
17 जानेवारीला रम्पुराच्या गौतम कुर्मी यांच्या शेतातील घरात संतोष यादव यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला होता. जवळपास 200 लोकांची चौकशीनंतरही गुन्ह्याचा उलगडा होवू शकला नाही मात्र 26 जुलैच्या रात्री गावातील क्रिकेट मैदानाच्या बाजुला दारूड्याने संतोष यादवला त्याच्या मेहुणीसोबतचे लफडे समजल्याने मीच त्याला मारून टाकल्याचे दारूड्या बडबडत असल्याने अज्ञातांनी पोलिसांना माहिती दिली व बेवड्या असलेला प्रियकर संदीप चढार (28) यास ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्रियकर संदीपने प्रेयसीला विश्वासात घेऊन कट रचला. तिने फोन करून संदीपला संतोष शेतात झोपायला गेल्याचे कळविले. यानंतर संदीपने त्याचा खून केला. पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !