माध्यमांनी सूत्रांचा अहवाल देत बातम्या दिल्या तर चुकीचे कसे : हायकोर्ट
मुंबई : माध्यमांनी सूत्रांचा अहवाल देत बातम्या चालवल्या असतील, तर ते चुकीचे कसे काय आहे? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दाखल केलेल्या याचिकेदरम्यान विचारला. मुंबई हायकोर्टात अनेक मीडिया एजेन्सी विरोधात बदनामीचा दावा अभिनेत्री शिल्पाने दाखल केला होता. हायकोर्टाने वकिलाला असंही सांगितलं आहे, की शिल्पाच्या पतीविरोधात केस सुरु आहे आणि हे कोर्ट कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. तुमचा ग्राहक कोणीही असू शकतो, पण बदनामीसाठी एक कायदा आहे.
त्या बातम्या अपमानास्पद नाहीत
न्यायालयाने पुढे सांगितलं की, पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार केलेल्या बातम्या, अपमानास्पद नाही. शिल्पाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मीडिया ज्या बातम्या चालवत आहे , त्याचा परीणाम शिल्पाच्या मुलांवर होतो आहे. तिच्या रडण्यावरुन कळतं की एक माणूस आहे. यावर कोर्टाने वकीलाला विचारलं की, आता तुम्ही अशी अपेक्षा करता का ? की कोर्टाने बसून प्रत्येक बातमीच्या मागील सूत्रांबाबतची चौकशी करावी.



