एसबीआयचे एटीएम फोडले : 19 लाखांची रक्कम लंपास


खामगाव : खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाळापूर ते लाखनवाडा या मार्गावरील पळशी बु.॥ येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडत त्यातील 19 लाखांची रोकड लांबवल्याची घटना 30 जुलै रोजी पहाटे उघड झाली. एटीएममध्ये गुरुवार, 28 जुलै रोजी दुपारी दहा लाख रुपये व आधीचे दहा लाख असे एकूण वीस लाख रुपये या मशीनमध्ये असल्याचे सांगण्यात आले. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफिक शेख हे सकाळीच घटना स्थळी पोहचून घटनेची पाहणी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !