भीषण अपघात : चारचाकी नदीत कोसळल्याने तिघे ठार
अमरावती : भरधाव चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती नदीच्या दरीत कोसळल्याने चालकसह प्रवासी ठार झाले. शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात वर्धा जिल्ह्यातील चिस्तूर या गावाजवळ झाला. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर भरधाव वेगाने जाणारी चारचाकी (एम.एच.30 पी.3214) क्रमांकाच्या कारला अपघात झाल. या अपघातात अमित गोयते (32, रा.बडनेरा) , शुभम गारोडे (25, रा.अमरावती), आशिष माटे (रा राजुरा, जि.अमरावती) हे तिघे जागीच ठार झाले असून शुभम भोयर हा सुखरूप बचावला आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.