नारायणगावातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकासह चौघांचे निलंबन
पुणे : राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी नारायणगाव येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व दोन कर्मचार्यांना निलंबीत केल्याने खळबळ उडाली आहे. निरीक्षक जी. डि. कुचेकर , नारायणगाव बिट क्र 1 चे दुय्यम निरीक्षक ए. ई. तातळे, जवान विजय घुंदरे, दिलीप केकरे अशी निलंबीत झालेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकाने रविवार, 25 जुलै रोजी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील 4 परमिट रुम व एका देशी दारूच्या दुकानावर छापा टाकून विना वाहतूक पास असलेला विविध कंपन्यांचा देशी व विदेशी दारू जप्त केली होती. स्थानिक अधिकार्यांची कारवाईची जवाबदारी असताना त्यांच्याकडून कर्तव्यात कसून झाल्याने संबंधिताना निलंबीत करण्यात आले.