सराफा व्यावसायीकाला चार लाखांचा चुना : आरोपीला अटक


डोंबिवली : सोनाराकडून सव्वा चार लाखाचे सोने घेऊन पसार झालेल्या भामट्याला कल्याण क्राइम ब्रान्चने 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. विनय लोहिरे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात याआधी देखील पुणे व ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. डोंबिवली पूर्वेकडील नार्वेकर ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदी करण्याच्या संशयीत विनय लोहिरेने 4 लाख 22 हजाराचे सोन्याचे दागिने विकत घेतले. त्यानंतर त्याने दुकान मालकाला रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्याचं सांगितले. दुकानदाराने बँक खाते तपासले मात्र पैसे नव्हते मात्र या इसमाने त्याला पैसे ट्रान्सफर झाल्याचा खोटा मेसेज दाखवला . तसेच एक चेकदेखील दिला. त्यानंतर दुकानदाराने त्याला जाऊ दिले. मात्र काही वेळाने पैसे ट्रान्सफर न झाल्याने दुकानदाराने शहानिशा केली असता या भामट्याने दाखवलेला मेसेज खोटा असल्याचे दुकानदाराच्या निदर्शनास आले. मात्र तोपर्यंत हा भामटा दुकानातून पसार झाला मात्र सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला होता. अंबरनाथ येथून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !