सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईंच्या मुलीचा छळ : तिघांना अटक
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची कन्या करीश्मा हिचा तिच्या सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी छळ झाल्याप्रकरणी सासरच्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पेालिसांनी करीश्माचे सासरे पुरुषोत्तम दरोकर (56), सासू ललिता दरोकर (52) व संजय टोंगसे (45) यांना अटक केली तर पती पलाश दरोकर आणि प्रशांत टोंगसे हे दोघे पसार झाले आहेत. करीश्माचा विवाह नागपुरातील ओंकारनगर भागात राहणार्या पलाश दरोकरशी झाला. पण लग्नाच्या काही काळानंतर तिचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी हुंड्यासाठी छळ व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत 5 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.