अल्पवयीन मुलीवर गँगरेप : चौघांना अटक


नागपूर : कुटुंबात झालेल्या वादानंतर घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन तरुणीवर ऑटो चालकासह चौघांनी गँगरेप केल्याची संतापजनक घटना उपराजधानीत घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौघा आरोपींना अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 29 जुलैच्या रात्री पीडीतेला वहिनीने रागावल्याने ती घराबाहेर पडली. मेडिकल चौकातून तिने एका ओळखीच्या ऑटोचालकाला सीताबर्डीला सोडण्यास सांगितले. त्याने तिला मानस चौकात सोडून दिले. तिथे दुसरा ऑटोचालक साना याची तिच्यावर नजर पडली. त्याने मदतीचा हात पुढे करून तिला ऑटोत बसविले व मोमिनपुर्‍यात घेऊन गेला. तिला दारू पाजली. एका खोलीत घेऊन गेला व तीन मित्रांना पुन्हा बोलावले. आरोपी सानासह अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा मेयो रुग्णालयासमोर सोडून दिले. तिथे दोन ऑटोचालकांची तिच्यावर नजर पडली. त्यांनीसुद्धा तिच्यावर अत्याचार केला व पसार झाले. ती मेयो रुग्णालय चौकात मदत मागत असताना दोघांनी आपल्या गाडीवर तिला रेल्वे स्टेशनवर सोडले. रात्री उशिरा जीआरपीच्या गस्त घालणार्‍या पथकाला ती रेल्वे स्टेशनवर आढळली. त्यांनी तिला महिला बालगृहात पाठविले. तिथे बाल कल्याण समितीपुढे अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. समितीच्या सूचनेनुसार जीआरपीने तिचा जबाब नोंदवून घेतला. पीडित मुलीवर यापूर्वीही इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार झाला होता. अनेक दिवस महिला बालगृहात राहिल्यानंतर ती घरी परतली होती परंतु घरच्यांचा तिच्यासोबत नेहमीच वाद होत होता.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !