धक्कादायक ! : अवघ्या पाचशे रुपयांसाठी भावाचे घेतले प्राण


पाटणा : अवघ्या पाचशे रुपयांसाठी भावानेच भावाचा जीव घेतल्याची संतापजनक घटना बिहारात घडली. लहान भावाकडे मोठा भाऊ पाचशे रुपये मागता होता मात्र ते न दिल्याने संतापाच्या भरात लहान भावाला काठीने मारहाण करण्यात आल्याने भावाचा मृत्यू ओढवला. कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोंधी गावात ही घटना घडली. संशयीत रामू मजूरी करतो. अल्पवयीन असलेल्या लहान भावाकडे संशयीताने पैसे मागितले मात्र ते न दिल्याने राग मनात धरून रामूने लहान भावाला काठीने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !