ऐकावे ते नवलच ! 17 वर्षीय तरुणाने 35 वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार


रायपूर : प्रेमाला वयाचे बंधन नसल्याचे म्हटले जाते व या वाक्यास साजेशी घटना छत्तीसगडमधील जशपूर येथील बगीचा ठाणे क्षेत्रात घडली. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाच्या संपर्कात 35 वर्षीय महिला आल्यानंतर दोघे प्रेमात आकंठ बुडाले. तरुणाने महिलेस सोबत राहण्याचे वचन देत लग्न करणार असल्याचे सांगत महिलेशी संबंध बनवले व हजारो रुपये महिलेकडून उकळले. लग्नाची वेळ आली तेव्हा मुलाने कानावर हात ठेवल्याने महिलेचे आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, या संदर्भात बगीचा पोलीस ठाण्याचे प्रभारी एसआर भगत यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर आम्ही संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे. अधिक चौकशी केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !