भरधाव दुचाकी धडकल्या : एस.टी.चालकासह दोघे जागीच ठार


माळशिरस : बुलेट व दुचाकीत जोरदार टक्कर झाल्याने दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. माळशिरस तालुक्यातील घुलेवस्ती येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सांगवी (ता.फलटण) येथील फलटण आगारातील चालक हनुमंत शंकर बेलदार (42, रा.सांगवीा) हे आपल्या बुलेट (एम.एच.11 सी.के. 2727) ने जात असताना माळशिरस येथील रावसाहेब सिद (45) हे शेतातून माळशिरसकडे दुचाकी (एम.एच. 45 सी.4993) ने असताना पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर घुलेवस्तीजवळ दुचाकी धडकल्याने दोघा वाहनांवरील दुचाकीस्वार जागेवरच ठार झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !