अनैतिक संबंधाला अडसर ठरणार्‍या पतीचा कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मदतीने केला खून


भिवंडी : अनैतिक संबंधात पतीच अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकर व मैत्रीणीच्या मदतीने कॉन्ट्रक्ट किलरच्या माध्यमातून पतीचा खून केला. झाले असे की, मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना 1 ऑगस्ट रोजी घडलीहोती. प्रभाकर गंजी असे मृत कारचालकाचे नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. मयताची पत्नी पत्नी श्रुती गंजी (32) हिचे संशयीत आरोपी नितेश गोवर्धन वाला (28) शी प्रेमसंबंध होते. पतीने घटस्फोट द्यावा म्हणून पत्नीने तगादा लावला मात्र तो घटस्फोट देत नसल्याने प्रियकर नितेश गोवर्धनवाला व मैत्रीण प्रिया निकम (32) यांनी तिघांनी मिळून दोन कॉन्ट्रक्ट किलर हायर करीत पतीची हत्या घडवून आणली.

एक लाखात दिली सुपारी
पत्नी श्रृती हिने दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणार्‍या दोघा जणांना दिली व त्यानंतर पत्नी श्रुती, प्रियकर नितेश, मैत्रीण प्रिया यांनी कट रचून हत्या करणार्‍यांनी 31 ऑगस्टच्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाइल करून रात्री कार बुक केली व त्यानंतर प्रवासात माणकोली येथे मारेकर्‍यांनी गळा आवळून हत्या करून शव कारमध्येच ठेवून पसार झाले. श्रृती, तिचा प्रियकर नितेश व मैत्रीण प्रिया या तिघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर किलर पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !