संतापजनक : पत्नीला देहविक्रीच्या धंद्यात ढकलले : चौघांविरोधात गुन्हा


नवी दिल्ली : पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना त्तराखंडच्या उधम सिंह नगरात घडली. पतीने आपल्याला पत्नीचे अश्‍लील व्हिडिओ काढून त्यानंतर पत्नीला धमकावत व ब्लॅकमेल करून तिला देहविक्रीच्या धंद्यात ढकलल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी यानंतर पीडीतेच्या तक्रारीवरून पती सक्षम चौधरी आणि त्याचा मामा विपुल चौधरी याच्यासोबत सासरा सतेंद्र चौधरी, मामी प्रियंदा चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाले आहेत.

जाच असह्य : पतीसह चौघांविरोधात गुन्हा
पीडितेचा पती तिला अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करायचा यामुळे तिला तो सांगेल तशी अनैतिक कामे करावी लागत होता. हा प्रकार खूप काळापासून सुरू होता शिवाय पत्नीला देहविक्रय करण्यास पतीने भाग पाडले. पोलीस अधिकारी अक्षय कोंडे यांनी सांगितले की, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून महिलेवर पतीकडून अत्याचार होत होते.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !