नवलच ! 50 वर्षीय सासुला भावला निम्मे वयाचा जावई : दोघेही रफुचक्कर
नवी दिल्ली : प्रेमाला वयाचे बंधन नसतं या वाक्याचा अनुभव अनेकदा येताना आपण पाहतो मात्र नात्याच्या सीमा पार करीत आपल्या वयापेक्षा निम्मे वयाच्या जावयासोबत चक्क सासूच रफुचक्कर झाल्याने नातेवाईकांना डोक्याला हात मारण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये ही घटना घडली आहे. खरे तर जावई व सासुत आई-मुलांचे नाते असायला हवे येथे मात्र चक्क नात्याचेही बंधनच तोडण्यात आले.
दोघे घरातून रफुचक्कर
प्रेमात आकंठ बुडालेल्या या सासू आणि जावयानं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघे घरातून पळून गेले आणि त्यांनी आयुष्यभर सोबत राहण्यासाठी लग्नही केलं. महिलेनं नुकतंच आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच तिचं आपल्या जावयावर प्रेम जडलं. यानंतर महिला आपल्या जावयासोबत घर सोडून पळून गेली. सासू आणि जावाई घरातून पळून गेल्यावर 10 महिने इकडे तिकडे सोबत राहिले. त्यानंतर ते घरी परतले. जेव्हा त्यांनी लग्न केल्याचं समजलं तर गावात आणि नातेवाईकांना एकच धक्का बसला. जेव्हा पती आणि आईच्या नात्याबाबत मुलीला माहिती झालं तेव्हा तिनंही गोंधळ घातला. मात्र, सासू आणि जावयानं स्पष्ट सांगितलं की, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि त्यांना सोबत राहायचं आहे. अखेर त्यांच्या हट्टापुढे नातेवाईकांनीही हार मानली.



