धक्कादायक ! : प्रेयसीच्या मुलाची प्रियकरानेच केली हत्या


तेल्हारा : प्रियकरानेच सोबत राहणार्‍या प्रेयसीच्या आठ वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना वाडी अदमपूर येथे शनिवारी रात्री घडली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आरोपी संजय श्यामराव नवलकर (32) हा पतीपासून वेगळे राहत असलेल्या फिर्यादी सोनाली राजू कुमरे (30) हिच्या दोन मुलांसह राहत होता. फिर्यादी सोनालीला मुलगा वेदांत व एक मुलगी श्रावणी असे दोन अपत्ये असून वेदांत (8) याने पिण्याच्या पाण्याच्या माठात ग्लास बुडविल्याच्या कारणावरून आरोपी संजय नवलकर याने लाकडाच्या साहाय्याने मारहाण करू लागला. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याची बहीण श्रावणी गेली असता, तिला देखील काठीने मारून जखमी केले. त्यानंतर आरोपी संजय नवलकर याने वेदांच्या छातीवर दगड ठेवून त्याची हत्या केली. तसेच फिर्यादी सोनाली राजू कुमरे हिला जीवे मारण्याची धमकी दिली. सोनाली कुमरे हिच्या फिर्यादीनुसार आरोपी संजय नवलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !