जमिनीच्या वादातून भावाचा खून : तिघांना अटक


टाकळी हाजी : शेत जमिनीच्या वादातून भावाचाच खून करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे ही घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेत राणू जाधव (60) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी बाबाजी रानु जाधव, पुष्पा बाबाजी जाधव व शीतल रानु जाधव (सर्व रा. शितोळे वस्ती कवठे येमाई ता. शिरूर) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींच्या मारहाणीत अत्यवस्थ झालेल्या राणू जाधव यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !