वढोदा वनक्षेत्रात वाघ जखमी ?
खातरजमा करण्यासाठी वनविभाग ट्रॅप कॅमेरे लावणार
मुक्ताईनगर : तालुक्यातील पट्टेदार वाघांचा अधिवास क्षेत्र असलेल्या वढोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा वनपरीमंडळात एक पट्टेदार वाघ जखमी असल्याची चर्चा आहे. या संदर्भात खातरजमा करण्यासाठी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावून शोध मोहिम राबवली जात आहे. नांदवेल येथील दीपक वाघ हे दुचाकीने मुक्ताईनगर जात असतांना पावरी वाड्यालगत दुचाकीसमोरून वाघाने रस्ता ओलांडला. यावेळी वाघाच्या मानेवर जखम झाली असल्याचो दीपक वाघ यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या संदर्भात वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण म्हणाले की, वाघ जखमी आहे वा नाही याची खात्री करण्याठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वनमजुरांचे पथ नेमून लक्ष ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.