जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या प्रवेशासाठी उद्या निवड चाचणी


भुसावळ : केंद्र संचलित जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीच्या 80 जागांसाठी बुधवार, 11 ऑगस्ट रोजी निवड चाचणी होत आहे. 11 हजार 790 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रवीष्ट आहेत. दरवषी प्रवेश परीक्षा राबविण्यात येते त्या अंतर्गत निवड चाचणी घेण्यात येते. 2021-22 च्या प्रवेशाकरीता ऑक्टोबर महिन्यात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून जिल्हाभरातून 11 हजार 790 विद्यार्थ्यांचे अर्ज निवड चाचणीसाठी प्राप्त झाले होते. निवड चाचणी एप्रिल मध्ये होणार होती परंतु कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा बुधवार, 11 ऑगस्टला जिल्ह्यातील 31 केंद्रावर होत आहे. सकाळी 11:30 ते 01:30 या कालावधीत होईल. विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ वाजताच केंद्रावर हजर राहावे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागातर्फे केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण सॅनेटायजेशन तसेच कोविड अंतर्गत सर्व नियमांचे जसे सोशल डिस्टनस, मास्क ई.चे कटाक्षाने पालन करण्यात येईल. या संदर्भात कुठलीही भीती मनात पालकांनी बाळगू नये, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !