बिग ब्रेकींग : प्रवासी बससह कारवर दरड कोसळली : 30 प्रवासी बेपत्ता
शिमला : किन्नौर जिल्ह्यातील महामार्गावर प्रवासी बस व कारवर अचानक दरड कोसळल्याने मोठी प्राणहानी झाल्याची भीती व्यक्त हेात आहे. बुधवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी मोठे दगड कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. प्रवासी बस मधील 25-30 प्रवासी अद्याप बेपत्ता असून त्यातील सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. किन्नोर येथे झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी प्रशासकीय अधिकार्यांना बचाव कार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहे.
गृहमंत्र्यांनी घेतली अपघाताची माहिती
मुख्यमंत्री जयराम ठाकुर म्हणाले, मी पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ ला देखील अलर्ट दिला आहे. एक प्रवासी बस आणि कार अडकल्याची माहिती मिळाली आहे. या बद्दलची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. किन्नोर येथे झालेल्या अपघातानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांनी फोन करून अपघाताची माहिती घेतली. तसेच घटनास्थळी लवकरात लवकर सुविधा पोहचवण्याचे आदेश दिले आहे.



