भुसावळात सीबीआय ट्रॅप : रेल्वे मंडळ अभियंता व ओएस जाळ्यात
दोन लाख 40 हजारांची लाच भोवली : नागपूर सीबीआयच्या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ
भुसावळ : भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे यांना दोन लाख 40 हजारांची लाच घेताना नागपूर सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. नागपूर सीबीआयच्या तब्बल 18 जणांच्या पथकाने सोमवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील अधिकार्यांच्या दालनातच लाच घेताना अधिकार्यांना अटक केल्याने लाचखोरा अधिकार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
- भुसावळातील रेल्वेतील लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले 15 लाखांचे घबाड
डीआरएम कार्यालयातील दालनातच स्वीकारली लाच
नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी 40 हजारांची लाच मागितल्याने मलकापूर येथील तक्रारदारो नागपूर सीबीआयडे तक्रार केली होती. लाचेची पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा यशस्वी करण्या आला. दरम्यान, दोघा अधिकार्यांच्या घराची सीबीआयकडून झडती ससुरू असून त्यात काय सापडले याबाबत माहिती कळू शकली नाही.



