काय सांगता : प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकार्याला गावकर्यांनी धो-धो धुतले !
नवी दिल्ली : प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री आलेल्या एका पोलीस अधिकार्याला गावकर्यांनी खांबाला बांधून चांगलेच बदडून काढल्याची घटना उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील घडली. अशोक कुमार चतुर्वेदी असे मारहाण झालेल्या अधिकार्याचे नाव असून त्याला पोलीस विभागाने निलंबीत केले आहे.
खांबाला बांधून केली मारहाण
सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी एसआय अशोक कुमार चतुर्वेदी हा मध्यरात्री आल्यानंतर त्याने प्राथमिक शाळेजवळ आपली बाईक लावली. मध्यरात्री तीन वाजता घरातून तो बाहेर पडताच ग्रामस्थांनी त्यास पकडले. यावेळी गावकर्यांनी अधिकार्याने सरकारी रीव्हाल्वरने हवेत फायरिंग केल्याचा आरोप आहे. संतप्त ग्रामस्थांनी आधी पोलीस अधिकार्याला मारहाण केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून त्याला मारलं. सूचना मिळाल्यावर पोलिसांना कसाबसा त्याचा जीव वाचवला. दरम्यान, एसपी आशीष श्रीवास्तव म्हणाले की, एसआयवर गावकर्यांनी फायरिंगचा आरोप लावला असून तो वर्दीत गावात आला नव्हता. एसआयला पदावरून निलंबित करण्यात आलं आहे.



