धक्कादायक ! : महिलांनी गुप्तांगात लपवले 50 लाखांचे सोने


मुंबई : एनसीबीने मुंबई विमानतळावरुन तीन महिलांना अटक केली आहे. या महिलांनी गुप्तांगात तब्बल 50 लाखांचे सोनं लपवल्याची बाब उघड झाली आहे. मोहमुद खुरेशा अली (61 वर्षे), अब्दुल्लाही अब्दिया अदान (43), अली सादिया अल्लो (वय 45 वर्षे) अशी या महिलांची नावे आहेत. या तिघी देखील केनियाच्या नागरिक आहेत. या तिन्ही महिलांनी चक्क कंडोमचा वापर करून सोन्याची तस्करी केली. या तिन्ही महिला दोहा येथून मुंबईत आल्या होत्या. त्यांनी सोनं पॅकिंगसाठी कंडोमचा वापर केला. तसेच गुप्तांगात 50 लाखांचं सोनं या तिन्ही महिलांनी लपवलं होतं. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला पँटमध्ये ड्रग्ज लपवून आणत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. मात्र स्कॅनिंगमध्ये ड्रग्ज ऐवजी सोने आढळले. महिलांनी कंडोममध्ये सोनं भरून गुप्तांगामध्ये सोनं लपवलं होतं. यातून तब्बल 937.78 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या 13 पॅकेट्समध्ये 17 सोन्याचे भाग सापडले आहेत. दरम्यान, ड्रग्स आढळून न आल्याने सोन्याची तस्करी करणार्‍या त्या तीन महिलांना एनसीबीने कस्टम्सकडे सोपवलं आहे. महिलांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !