उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन


नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची शनिवारी रात्री लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली होती. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती तसेच त्यांना व्हेंटिलेटरवही ठेवण्यात आलं होतं, शिवाय हाय प्रेशर ऑक्सिजनही देण्यात आलं होतं. परंतु शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली.





उत्तर प्रदेशात तीन दिवसीय दुखवटा
कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, 23 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर 23 ऑगस्टला सायंकाळी नरोरा येथे गंगा नदीच्या किनार्‍यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील तसेच, 23 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !