दुसरी-तिसरी यादी आल्यानंतर खडसे खुष होतील -रावसाहेब दानवे

मुंबई : सलग सहा टर्मपासून आमदार राहिलेल्या एकनाथराव खडसे यांना भाजपाने जाहीर केलेल्या 125 उमेदवारांच्या यादीत स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असताना राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना छेडल्यानंतर त्यांनी कदाचित दुसरी-तिसरी यादी आल्यानंतर खडसे खुष होतील, असे सूचक विधान केले आहे. भाजपातर्फे बुधवारी दुसरी यादी जाहीर केली जाणार असून या यादीत खडसेंचे नाव असण्याची दाट शक्यता आहे. दानवे यांनी मुक्ताईनगरात अद्याप दुसरा उमेदवार जाहीर केला नसल्याचेही सूचक विधान खडसे समर्थकांना दिलासा देणारे ठरले आहे.
खासदार खडसे चंद्रकांत दादांच्या भेटी
खडसेंच्या उमेदवारीबाबत तर्क-वितर्क लढवले जात असताना खासदार रक्षा खडसे या बुधवारी मुंबईत दाखल झाल्या असून त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.