40 वर्षीय पोलीस हवालदाराची आत्महत्या
मुंबई : मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार सुरेश चव्हाण (40) यांनी अंधेरी मरोळ भागात त्यांच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. कॉन्स्टेबल सुरेश चव्हाण ठाण्याच्या मुंब्रा पोलीस ठाण्यात तैनात होते. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त चव्हाण यांच्या पत्नी आणि दोन मुले राखी बांधण्यासाठी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले होते. चव्हाण यांचे कुटुंबिय जेव्हा मंगळवारी संध्याकाळी घरी आले असता हा प्रकार उघड झाला.