भुसावळात भाजपा आमदार संजय सावकारेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज


उद्या शक्तीप्रदर्शन करून भरणार पुन्हा उमेदवारी अर्ज : प्रचार कार्यालयापासून निघणार रॅली

भुसावळ : भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात आमदारांसोबत नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, उद्योजक मनोज बियाणी शिवसेनेचे बबलू बर्‍हाटे आदी उपस्थित होते.

उद्या शक्तीप्रदर्शनानंतर भरणार उमेदवारी अर्ज
सलग दोन टर्मपासून आमदार असलेले संजय सावकारे हे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थिती शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज पुन्हा भरणार आहे. गुरुवारी त्यांनी एक अर्ज दाखल केला असलातरी शुक्रवारी मात्र पक्षाचा एबी फार्म लावून ते अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी जामनेर रोडवरील दर्डा भवनापासून ढोल-ताशांच्या गजरात समर्थकांची रॅली निघणार आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !