भुसावळातील राष्ट्रवादीचे इच्छूक उमेदवार सतीश घुलेंनी दाखल केला अर्ज


भुसावळ : भुसावळ विधानसभेतील राष्ट्रवादीचे इच्छूक उमेदवार सतीश घुले यांनीही गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अष्टभुजा देवी मंदीरापासून ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उमेदवारी अर्ज सादर करताना माजी आमदार संतोष चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे आदींची उपस्थिती होती.

शक्तीप्रदर्शन करीत भरला अर्ज
श्री अष्टभूजा देवी मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवार सतीश घुले यांच्यासह समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करीत तहसील कार्यालय गाठले. याप्रसंगी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, शहराध्यक्ष नितीन धांडे, वरणगाव नगरपालिकेचे गटनेते राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, महिला तालुकाध्यक्ष मयुरी पाटील, बुटासिंग चितोडीया, पालिकेचे गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक शेख साजीद, ईकबाल बागवान, आशिक शेख आदींसह शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !