माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या भूमिकेकडे लागले राज्याचे लक्ष


मुक्ताईनगरात अ‍ॅड.रोहिणी खडसेंसह सेनेचे चंद्रकांत पाटील यांनीही घेतला अर्ज

मुक्ताईनगर : भाजपाने तिकीट कापल्याने नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपली भूमिका जाहीर करणार असल्याने संपूर्ण राज्याचे त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. खडसेंच्या निर्णयानंतर अनेकांची यशापशाची गणिते अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सहा जणांनी 12 अर्ज घेतले. आतापर्यंत 53 इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष व अनिल गंगतिरे यांनी अपक्ष यांनी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात आले.

सेनेच्या भूमिकेकडेही लागले लक्ष
खडसेंऐवजी त्यांची कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना भाजपाने तिकीटाची ऑफर दिल्याचे सांगण्यात आल्याने शुक्रवारी भाजपा पुन्हा आपली उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असलीतरी मुक्ताईनगरात सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे राहणार आहे. गुरुवारी प्रवीण मोरे (तांदलवाडी) यांनी नंदकिशोर महाजन (भाजप) यांच्यासाठी दोन अर्ज घेतले, गणेश गलवाडे यांनी अ‍ॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांच्यासाठी भाजप व अपक्ष असे दोन, प्रवीण चौधरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी दोन अपक्ष अर्ज, विनोद पडार यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे 2, ब्रिजलाल इंगळे यांनी 2, प्रमोद सौंदळे यांनी 2 अर्ज असे 12 सहा जणांनी 12 अर्ज घेतले.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !