रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आज भरणार उमेदवारी अर्ज

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन रॅली काढून सादर होणार उमेदवारी अर्ज
रावेर : रावेर विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी हे शुक्रवारी सकाळी 10 वाजता हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. छोरीया मार्केटपासून शक्ती प्रदर्शन करीत ढोल-ताशांच्या गजरातील रॅलीला प्रारंभ होणार आहे. अनिल चौधरींच्या प्रचारासाठी त्यांचे मोठे बंधू व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, त्यांचे पूत्र तथा कृउबा सभापती सचिन चौधरी यांच्यासह चौधरी कुटुंबातील सदस्यही अनिल चौधरींच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराला लागले आहेत.

