माजी मंत्री खडसे भाजपातच : अ‍ॅड.रोहिणी खडसेंना निवडून आणण्याचे केले आवाहन


पक्ष सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम : पक्षादेश मान्य : अ‍ॅड.रोहिणी खडसे गहिवरल्या

मुक्ताईनगर : सुमारे तीन वर्षांपासून मंत्री पासून अलिप्त असलेल्या एकनाथराव खडसेंची ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट न देवून कोंडी केल्याने खडसेंचे समर्थक प्रचंड संतप्त झाले होते शिवाय खडसेंनी अपक्ष वा राष्ट्रवादीत प्रवेश करावा, यासाठी आग्रह वाढला होता. खडसे शुक्रवारी सकाळी 11 वाजता भूमिका मांडणार असल्याने राज्याचे लक्ष लागले होते मात्र त्यांनी भाजपातच राहण्याचा निर्णय घेतला असून कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना निवडून आणण्याचे आवाहन करताना पक्षाचा आदेश शिरसावद्य असल्याचे कार्यकर्त्यांना सांगत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

पक्षासमोर अडचणी असल्याने निर्णयाला विलंब
तब्बल 42 वर्षांपसून पक्ष वाढीसाठी खस्ता खाणार्‍या खडसेंना पक्षाने अलगद खड्यासारखे बाजूला केल्याने निष्ठावान कार्यकर्ते बैचेन होते त्यामुळे शुक्रवारी नाथाभाऊ काहीतरी मोठा निर्णय घेतील, अशी शक्यताही होती मात्र आपण पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाने दिलेला निर्णय आपल्याला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. मला मिळालेले सहकार्य अ‍ॅड.रोहिणीताईंना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त करीत काही अडचणी पक्षासमोर असतात त्यामुळे उमेदवारीला विलंब लागता मात्र उशिरा का असेना भाजपाने आमच्यासाठी चांगला निर्णय घेतला, आपल्या माणसाला तिकीट मिळाल्याचा आनंद आहे. माझ्यासारख्या अ‍ॅड.रोहिणीताई खडसे तुम्हाला प्रेम देण्याचा प्रयत्न करतील, सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने रोहिणीताईंना सहकार्य करावे, असे आवाहनही खडसे यांनी केले. आपण आजवर पक्षाच्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन केल्याचे सांगत आतादेखील पक्षाचा निर्णय स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. अगदी मंत्रीपद सोडण्याचे आदेशदेखील आपण स्वीकारले. आपण पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते असून हा निर्णयदेखील स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगत आतापर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना वरीष्ठ पातळीवर कळवल्याचे ते म्हणाले.









अ‍ॅड.रोहिणीताई गहिवरल्या
राजकारणातील बाप माणूस असलेल्या नाथाभाऊंनी पक्षाने तिकीट नाकारल्याने सर्वत्र संतापाची लाट असतानाच दुसरीकडे खडसेंच्या कन्येला भाजपाने तिकीट देवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. खडसे बोलत असताना अ‍ॅड.रोहिणी यांना अश्रू आवरणेदेखील कठीण झाले होते. दरम्यान, काही वेळात अ‍ॅड.रोहिणी या शक्तीप्रदर्शन करून अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !